आमगाव,दि.१७ःराज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक अविश्वासनीय व अकल्पनीय आहेत.त्यामुळे ईव्हीएम हटाव देश बचाव या मोहिमेंतर्गत आमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसिलदार याना निवेदन सादर करुन मतपत्रिकेवरच मतदान घेण्याची मागणी करण्यात आली.
या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदान झाले.त्याच रात्री 11.30 वाजता 65.02 टक्के तर देव दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी हेच मतदान 66.05 टक्के झाल्याचे सांगितले.यात एकूण 7.83 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.तब्बल 76 लाख मताची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा का वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे ईव्हीएम हटाव देश बचाव चा नारा नागरिक करीत आहेत तसेच मतदान मतपत्रिकेवर घेण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक करीत आहेत.
याबाबतचे निवेदन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महिला अध्यक्ष वंदनाताई काळे, काँग्रेसचे नेते एड. दुष्यंत किरसान, तालुका अध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुका अध्यक्ष छबुताई उके, किसान विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप टेंभरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
यावेळी किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप टेंभरे, तालुका महासचिव राधाकिसन चुटे, महिला शहर अध्यक्ष प्रभादेवी उपराडे, सुनंदा येरणे, महेश उके, रामेश्वर शामकुवर, सिरेंद्रसिंह ठाकूर,युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष राहुल चुटे, अभय ढेंगे, मृदुल मिश्रा, राजू काळे,देवकांत बेहकार, रामदास गायधने, यादोराव भोयर, राजेंद्र हत्तीमारे, येवकरम उपराडे, हंसराज मेश्राम, श्यामराव हुकरे, शुभम फरदे, आकाश राऊत, टेकराम हेमने, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.