२० डिसेंबर पासून एफ.एम. १०३.६ मेगाहर्ट्जवर प्रसारण
वाशिम, दि.18 डिसेंबर-आकाशवाणी मुंबई केंद्राच्या विविध भारतीचे कार्यक्रम वाशीम जिल्ह्यातील श्रोत्यांना व्यवस्थित ऐकायला मिळावे. यासाठी वाशीम येथील दूरदर्शनच्या पुर्व लघु प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात आकाशवाणीचे एफ.एम.ट्रान्समीटर (१००.१ वॅट) प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले.या रिले केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ एप्रिल २०२३ रोजी आभासी पद्धतीने करण्यात आले होते. त्यावेळी आकाशवाणी वाशिम केंद्राचे प्रसारण हे एफ.एम.१००.१ मेगाहर्टझवर सुरू झाले.
येत्या २० डिसेंबर २०२४ पासून आकाशवाणी वाशिमची फ्रिक्वेन्सी ही बदलण्यात येणार असून एफ.एम. १०३.६ मेगाहर्टझवर श्रोत्यांना आकाशवाणी वाशिम केंद्राचे प्रसारण ऐकता येईल. अधिक सुस्पष्ट, श्रवणीय प्रसारणाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी वाशिमचे प्रभारी आणि अकोला केंद्राचे सहाय्यक केंद्र निदेशक अरुण सावदेकर यांनी केले आहे.