अर्जुनी मोरगाव,दि.२०ः- परभणी येथे दहा डिसेंबर 2024 रोजी देशद्रोही व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली.त्याचेवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अर्जुनी मोरगाव तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राज्यपाल,मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या नावे तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना देण्यात आले.
परभणी येथे दहा डिसेंबर रोजी देशद्रोही समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे. या देशद्रोही कृत्याचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर माइंड चा शोध घेण्यात यावा. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरवाद्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे.तेव्हा मानवी अत्याचार करणाऱ्या पोलिसावर तातडीने कारवाई करावे. सदर देशद्रोही समाजकंटकावर योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील यासाठी हे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी राजेंद्र जांभुळकर, सोनदास गणवीर, रमेश लाडे, हिरालाल कोटांगले, मोरेश्वर धारगावे, भैय्या मेश्राम, राष्ट्रपाल रामटेके, श्रीकांत लोणारे व अन्य समाज बांधव उपस्थित होते.