मृतक सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची घेतली भेट
अर्जुनी मोरगाव,दि.२०-परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड़ झाल्यामुळे समस्त आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी समाजात असंतोष निर्माण झाला. या घटनांचा निषेध व्यक्त करत असंतोषाला मार्ग देण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनाबाधित स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वन दिले.सोबतच परभणी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करीत सविस्तर माहिती जाणून घेतली.
तसेच, लोकनेते स्व. विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. घटनेच्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडून सखोल माहिती घेतली. याशिवाय, शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित वच्छलाबाई मानवतेची भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचारपूस केली.ही घटना समाजात तणाव निर्माण करू शकते, म्हणून प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आणि या प्रकरणी त्वरित चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केल्याचे सांगीतले.