वंचित बहुजन आघाडीची मागणी: तहसीलदारांना दिले निवेदन
अर्जुनी मोरगांव :परभणी शहरात भारतीय राज्यघटनेच्या प्रतिमा तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याकरिता आणि पोलिसांच्या कोंबिंग कारवाईत मृत्यू पावलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी च्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन तहसीलदार अर्जुनी मोर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून पुतळ्यास क्षती पोहोचविण्याचा तसेच पुतळा परिसरात असलेल्या संविधानाची प्रतिकृती तोडफोड करण्याचा प्रयत्न करून मोठा अनुचित प्रकार घडविण्याचा प्रकार होता. म्हणून सदर घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर आमचा तसुभरही विश्वास राहिलेला नाही.न्यायालयीन चौकशीची मागणी करीत आहे. सोबतच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर तागडे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव सलामे, युवा तालुकाध्यक्ष कैलास इस्कापे ,उपाध्यक्ष दिपेंद्र उके,महासचिव संदीप नंदागवळी, रोहित रामटेके ,तालुका संघटक हर्षपाल लोणारे,लोमेश सांगोळे ,आशिष कांबळे,प्रसिद्धी प्रमुख विश्वरत्न रामटेके, शुभम मेश्राम,प्रितम राजकुमार टेंभूर्णे,अक्षय खुशाल कटरे,धनंजय गोंडाणे , प्रकाश मनिराम टेंभूर्णे, अजय नामदेव कुंभरे व अन्य समाज बांधव उपस्थित होते.