भाकप व दलित अधिकार आंदोलनाची निदर्शने

0
85

गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पार्टी व अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या आव्हानानुसार आज गोंदिया जिल्हा शाखेच्या नेतृत्वात एसडीएम कचेरी समोर जोरदार निदर्शने करुन राष्ट्रपतीच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर..आंबेडकर म्हणण्याची फैशन झाली असून या पेक्षा देवाचा धावा केला,असता तर सात जन्म स्वर्ग प्राप्ती झाली असती असे वक्तव्य केले.ही बाब अत्यन्त गंभीर असून संविधान निर्मात्याबद्दल आरएसएसचा पूर्ण नियंत्रण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या मनात किती द्वेष हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.म्हणून गृह मंत्री अमित शाह यांचा राजीनामा घेण्यात यावा, परभणीतील घटनाक्रमाची सविस्तर चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात यावी, पोलिसाच्या कार्यवाहीत बळी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबास 50 लाखांची भरपाई देण्यात यावी सह इतर मागण्याचे निवेदन दिले. या निदर्शन आंदोलनात प्रामुख्याने हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, प्रल्हाद उके, अशोक मेश्राम, परेश दुरुगवार, सुरेश रंगारी, गुणतराव नाईक, यशवंत रामटेके, जितेंद्र गजभिये,प्रकाश डहाट, भीमराव वासनिक, आनंद वासनिक सह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.