गोंंदिया- संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर..आंबेडकर म्हणण्याची फैशन झाली असून या पेक्षा देवाचा धावा केला असता तर सात जन्म स्वर्ग प्राप्ती झाली असती असे वक्तव्य करुन गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याच्या निषेध नोंदवण्याकरीता तसेच परभणी येथील घटनेच्या विरोधात गोंदियात आज सर्वसमाज संघटनांच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच काँग्रेसच्यावतीने काँग्रेस कार्यालयापासून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्यावतीनेही एसडीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करुन केंद्रसरकार व भाजपविरोधी घोषणा देण्यात आल्या.
निवेदनात म्हंटले आहे की संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी द्वेष पूर्ण वक्तव्याचा व परभणी येथे भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाचा अवमान करणाऱ्या अतिशय घाणेरड्या मनोविकृतीचा मानसिकतेचा आम्ही समस्त गोंदिया जिल्ह्याचे दक्ष व जागरूक नागरिक अत्यंत तीव्र निषेध करतो व दोषीवर कठोर कारवाई करून देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे.
शिव फुले शाहू आंबेडकरी सर्वसमाज विचार मंच तर्फे निवेदन प्रस्तुत करणाऱ्या संघटनांमध्ये प्रामुख्याने संविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी अधिकार मंच, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, युवा बहुजन मंच, समता सैनिक दल, भारत मुक्ती मोर्चा, स्टूडेंट राइट्स असोसिएशन, युवा ग्रेज्यूएट फोरम, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, विदर्भ राज्य आंदोलन समिती, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, संघर्ष वाहिनी, अवामे मुस्लिम संगठन गोंदिया, भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (राज.) अन्याय निवारण मंच, संथागार परिवार, भीमघाट स्मारक समिती, कोरणी घाट पर्यटन समिती या सामाजिक संघटनांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बीआरएसपी, आरपीआई (राज.) आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये प्रामुख्याने संयोजक अतुल सतदेवे, सी.पी.बिसेन, वसंत गवळी, खेमेंद्र कटरे, यशवंत रामटेके, एड. वीरेंद्र जायसवाल, महेंद्र बिसेन, सुनील भोंगाडे, पप्पू पटले, मनोज मेश्राम, अफजल शाह कमर अली, मोहसीन खान, राजेश नागरिकर, पौर्णिमा नागदेवे, वैशाली कांबळे, प्रियंका गणवीर, नीलकंठ चीचाम, एड. नरेश शेंडे, चुनीलाल राऊत, नरेंद्र वाघमारे, देवा शहारे, प्रीती चौहान, मनोज बनसोड, सुनील भालेराव, सुशीला भालेराव दिनेश गेडाम, विलास राऊत, कमल बोंबर्डे, दुर्योधन गजभिये, कशिष चद्रिकापुरे, पूर्व आमदार दिलीप बंसोड, योगेश अग्रवाल, बलजित सिंग बग्गा, श्याम गणवीर, वंचित आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोड, मिलिंद गणवीर, हौसलाल रहांगडाले, परेश दुरुगवार, रामचंद्र पाटील, प्रफुल भालेराव, वर्तमानपत्र विक्रेता संघाचे दिनेश उके, विजय कांबळे, प्रदीप बनसोड, देवेंद्र वासनिक, शेखर भालेराव, एम. डी.चौहान, राजगिरी सामाजिक संस्थेचे धीरज मेश्राम, प्रफुल लांजेवार, प्रफुल डोंगरे, रवींद्र बडगे, सोमेंद्र डहाट, इंजी.स्नेहा, सतीश पारधी, छोटू बोरकर, संदीप मेश्राम, गणाजी चौहान, पंकज मेश्राम, सौरभ सावनकर, अक्षय नारनवरे, जी. डी.राऊत, सिद्धार्थ रामटेके, सदानंद पानतावणे, प्रकाश इलमकर, मौसमी भालाधरे, भूपेंद्र वैद्य, राजेश शेंडे, गौरव बिसेन, सोनू निशाणे, संजय मेश्राम, सुरेश रंगारी, करुणा गणवीर, विश्वदीप घरडे, प्रमोद गजभिये, शिवम, छाया प्रवीण कोचे, अनुपमा पटले, मनोहर भावे, महेंद्र मेश्राम, दीपक लोणारे, मंजू बावणे, विशाखा वासनिक, गीता मेश्राम, सचिन माने, शुभम गणवीर, विवेक बागडे, मिथुन गजभिये, अशोक मेश्राम, गज्जु नागदवने, रमेश गजभिये, सचिन मेश्राम, रवी भालाधरे, सचिन मेश्राम, आशा जैन, प्रदीप ठवरे, सतीश पारधी, एस पी बन्सोड, प्रवीण दवनिवाडा, कमलेश उके, बादल उके, प्रकाश डहाट, डी.एस.मेश्राम, संध्या अविनाश चौव्हान, सुभाष भालाधरे, सुभाष शेंडे, विनोद डोंगरे, नरेंद्र गजभिये, सी.के.चौव्हान, सीमा भालेराव, उमेश किरसान, ओम राऊत, दामोदर ठाकरे, निलेश देशभ्रतार, अंकेश रामटेके, टेकचंद जांभूळकर, जितेंद्र रंगारी, आकाश गजभिये, संजय बडोले, अनिल नागदेवे, अरुण बन्नाटे, यशपाल डोंगरे, नागरत्न बंसोड, अमर राहुल, रुपाली उके, चित्रा लोखंडे, मनीष मेश्राम, डॉ. महेंद्र गेडाम, डॉ. नितेश बाजपेयी, संजय मेश्राम, सुचित्रा मेश्राम, प्रमिला भालाधरे, देसंद्रा मेश्राम, वर्षा भोयर, ज्योती डोंगरे, कैलाश डोंगरे, भागवत पाऱ्हे, नामदेव मेश्राम, एच.जी.मेश्राम, पंचशील पानतावणे, डॉ. सी.आर टेंभुर्णे, डॉ. एम.बी. राऊत, प्रा. डी.एम. वासनिक, विनोद नांदुरकर, एस. डी. महाजन, प्रकाश कांबळे, दिनेश चौहान, महेश राऊत, चंद्रमणी गजभिये, दीपक बोरकर, रोहित सतदेवे आदी अन्य मोठ्या संख्येने शामील होते.