34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ वडसा व आमगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची खा.किरसान यांची रेल्वेमंत्र्याकडे मागणी

वडसा व आमगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची खा.किरसान यांची रेल्वेमंत्र्याकडे मागणी

0
177

blank

गोंदिया,दि.२०ः गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ.नामदेवराव किरसान यांनी मतदारसंघातील रेल्वेविषयक समस्यांना व रेल्वेगाड्याच्या थांबा मिळण्यासंदर्भात आज संसद भवनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत वडसा ते गडचिरोली रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.तसेच छत्तीसगड ते गडचिरोली रेल्वे लाईन भविष्यात करण्याच्या अनुषंगाने नकाशा घेऊन चर्चा केली.यावेळी मतदारसंघातील वडसा रेल्वे स्टेशनवर गाडी क्र. 22173 व 22174 जबलपूर ते चांदा फोर्ट व चांदा फोर्ट ते जबलपूर,गाडी क्र. 07051 व 07052 हैद्राबाद ते रकसौल व रकसौल ते हैद्राबाद या रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची मागणी केली.तर मतदारसंघातीलच आमगाव रेल्वेस्थानक येेथे गाडी क्र. 12069 व 12070 रायगड ते गोंदिया व गोंदिया ते रायगड जनशताब्दी एक्सप्रेसचा थांबा देण्यासंदर्भातील निवेदन दिले.

blank