नागपूर,दि.२३ : नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत आहे.यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात.यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाची पाहणी केली.तसेच यावेळी या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी नागपूरच्या जनतेची जाहीर माफी मागितली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी एअरपोर्ट ऑथोरिटी आणि मिहान अधिकारी उपस्थित होते.
नागपुर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपुर हवाई अड्डे के रन-वे के सुधार कार्य में हुई देरी के कारण नागपुरवासियों को हो रही तकलीफ के लिए क्षमाप्रार्थी हूं।#NagpurAirport #Maharashtra pic.twitter.com/IBXQ4ieiU9
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 23, 2024
मुबंई दिल्ली महामार्ग १३७० किमीचा एक लाख कोटींचा दोन वर्षांत केला आणि तीन किमीच्या रनवेसाठी दीड वर्षे कसे लागतात, हे हास्यास्पद आहे असेही गडकरी यावेळी म्हणाले. २०२४ मे महिन्यात के जी गुप्ता कंपनीला रनवे रिकार्पेटिंगचं काम दिलं. रनवे रिकार्पेटिंगच्या कामामुळे विमान कंपन्यांनी शेड्युल बदलले, त्यामुळे विमान तिकिटांचेच दर वाढले.
गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळ धावपट्टीचे काम प्रलंबित आहे. नागपूरमधील उड्डान सेवांवर याचा परिणाम होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश गडकरीजी यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.