. नगरपंचायत येथे मोफत विधी सेवा चिकित्सालयाचा सुभारंभ…
अर्जुनी मोरगाव, – न्यायालयीन खर्च सर्वसामान्य कुटुंबाना झेपण्यासारखे नसतात. हलाकीच्या परिस्थितीमुळे गरीब महिला,पुरुष कोर्टाच्या न्याय निवाड्यापासून वंचित राहतात.घटस्फोट, संपत्तीचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडणाऱ्या महिलांना कोर्टाचा खर्च आणी जाणीव जागृती नसल्यामुळे अन्याय सहन करावा लागत होता.हि गंभीर बाब लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने गरीब गरजू महिला,पुरुषांना न्यायालयीन प्रक्रियेत मदत व्हावी म्हणून मोफत विधी सेवा चिकित्सालय निर्माण करण्यात आले. या पुढे समाजातील दुर्बल घटकांनाही न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होईल.भारतीय संविधानानुसार प्रत्येकांना न्यायाचा हक्क खऱ्या अर्थाने अमलात येईल.हे चिकित्सालय गरजवंतांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे यांनी केले.
ते स्थानिक नगरपंचायत येथे गोंदिया जिल्हा विधी सेवा समिती,तालुका विधी सेवा समिती आणि नगरपंचायत अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा चिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे गटनेते यशकुमार शहारे, सभापती राधेश्याम भेंडारकर, नगरसेविका इंदू लांजेवार,तालुका विधी सेवा समितीचे पॅनल वरील ऍड.हिरालाल तुळशीकर,पी.एल.व्ही. कु.यस.यु. हर्षे,अभियंता निखिल बंड उपस्थित होते.
ऍड.तुळशीकर यांनी बीपीएलधारक पुरुष आणी सर्व प्रवर्गातील महिला यांच्यासाठी विधी सेवा चिकित्सालयाचे सुप्रीम कोर्टाच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार आणि बुधवार ला आठवड्यातून दोन दिवस वरील लाभार्थ्यांकरता मोफत कायदेविषयक सल्ला दिला जाईल.या विधी सेवा चिकित्सालयाचे शहरातील गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
नगरपंचायत अर्जुनी येथे मोफत विधी सेवा चिकित्सालयाचे कक्ष उभारण्यात आले आहे. आठवड्यातून दोन दिवस ज्यांचे न्यायालयीन खटले सुरू आहेत. कायदेविषयक माहिती हवी असलेल्याना या कक्षात ऍड.हिरालाल तुळशीकर मदत करणार आहेत.या कक्षाचे उद्घाटन नगराध्यक्ष बारसागडे यांचे हस्ते झाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करनिर्धारण अधिकारी दिलीप उईके,लेखापाल एकनाथ चौहान,लिपिक सुमित मेश्राम,शुभम गौरकर,दिपक राऊत, योगेश्वरी मेश्राम,निमिश मुरकुटे,दुर्योधन नेवारे,अरविंद लांजेवार,अश्विनी शहारे यांनी परिश्रम घेतले.