तालुकास्तरीय गोळाफेक स्पर्धेत जि. प.शाळा, मोरगावचा मयूर सोनवाने अव्वल

0
8

अर्जुनी मोर. -विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक, सांस्कृतिक, भावनिक विकास साधावा या दृष्टीने जिल्हा परिषद गोंदिया यांनी अटल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने पंचायत समिती अर्जुनी मोरगाव स्तरावर दिनांक १७ – २० डिसेंबर या काळात चार दिवसीय क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगावचा विद्यार्थीने तालुकास्तरावरील गोळफेक स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले.तर १००मीटर दौड माध्य.मुले गटातून समीर सुनील मानकरने द्वितीय स्थान पटकावले.
तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा व बुद्धी स्पर्धा घेण्यात आल्यात त्यात सदर स्पर्धेत पंचायत समिती अर्जुनी/ मोर अंतर्गत एकूण १५ केंद्रापैकी प्रथम क्रमांकाचे विजेते सहभागी झालेले होते त्यामध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगावचा विद्यार्थी मयूर विठ्ठल सोनवणे हयाने माध्यमिक गटातून गोळफेक स्पर्धेत अव्वल स्थान मिळविल्याने विजेती ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे सदर विद्यार्थीशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता पुढे जाऊन आपण देश सेवेसाठी सैनिक होण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यादृष्टीने आतापासूनच माझे प्रयत्न सुरू असल्याचे मनोगत व्यक्त केले. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण ,मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी, सरपंच गीता नेवारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे , सोनुताई कऱ्हाडे, ,मुनेश्वर शहारे, मोरगाव शाळेतील समस्त शिक्षक वृंद व गाव परिसरातील अनेक लोकांनी अभिनंदन केले.