अर्जुनी मोर तालुक्यात सक्रिय क्षयरोगशोध मोहीमेला प्रारंभ

0
17

अर्जुनी मोर.-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा गोंदिया व तालुका नियंत्रण पथक अर्जुनी /मोर अंतर्गत सक्रिय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन आज दिनांक 23/12/2024 ला  होमराज पुस्तोडे उपसभापती पंचायत समिती अर्जुनी मोर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सक्रिय शोध मोहीम दिनांक 23 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 पर्यंत एकूण टीम 14 यांचे मार्फत आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व स्वयंसेवक हे अति जोखमीच्या भागा मध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन क्षयरोगाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम डॉ. सुकन्या कांबळे तालुका आरोग्य अधिकारी, अर्जुनी/ मोर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. सुरेंद्र खोब्रागडे वैद्यकीय अधिकारी,एस .पी. धुर्वे आरोग्य सहाय्यक,व्ही.एस. कारेवार निम वैद्यकीय कर्मचारी व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आशा सेविका यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी रिजवाना शेख वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक यांनी केले. व आभार प्रदर्शन झामेश गायकवाड तालुका समूह संघटन यांनी मानले .