अर्जुनी मोर. -भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे अनमोल विचार देशाची एकता व अखंडता कायम ठेवुन देश प्रगती पथावर जाण्यासाठी सदैव प्रेरणादायीच आहेत.त्यांचे वक्तृत्वातुन कर्तृत्व सिद्ध करण्याची पध्दत भारतातील प्रत्येकाला प्रेरणादायीच ठरत असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले.
आमदार राजकुमार बडोले यांचे सडक / अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले बोलत होते.अध्यक्षस्थानी तालुका भाजपा अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये होते.यावेळी पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते,तुकाराम राणे,गिरधारी हत्तीमारे,तुलाराम येरणे,ओमप्रकाश टेंभुर्णे,हितेश डोंगरे,ललित डोंगरवार,मनोहर गहाणे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी लक्ष्मीकांत धानगाये यांनी स्व.भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे जिवनावर प्रकाश टाकतांना त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाची ईतभुत माहीती दिली.संचालन व आभार हितेश डोंगरे यांनी केले.