अभियंता दमाहेची प्रतिनियुक्ती रद्द करा-जि.प.सदस्य बावनथडे

0
676

गोंदिया,दि.२७ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत कार्यरत कनिष्ट अभियंता प्रविण दमाहे यांची तिरोडा येथे करण्यात आलेली प्रतिनियुक्ती रदद् करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे यांनी केली आहे.बावनथडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवदेनात सदर अभियंत्याची तक्रार करीत जिल्हा परिषद सदस्यांशी वर्तण योग्य नसल्याचे म्हटले आहे.दमाहे यांच्याकडे मुळ आमगाव तालुका असतांना तिरोडा तालुक्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे.ते तालुक्यात स्वतःच्या मर्जीने काम करीत असून आपल्या मतदारसंघातील सुचवलेली कामे नियोजनात घालण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे.सोबतच पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांना सन्मान न देता अरेरावीची भाषा वापरत असल्याचे आरोप करीत त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी बावनथडे यांनी केली आहे.यासंदर्भात जि.प.अध्यक्ष व बांधकाम सभापती यांनाही त्यांनी पत्र दिले आहे.

आपल्यावरील आरोप चुकीचे,सदस्य म्हणून सन्मानच दिला-अभियंता दमाहे

सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत आपल्याकडे आमगाव व तिरोडा उपविभागाचे काम असून वरिष्ठांना दिलेल्या सर्व कामाचे आपण योग्य पधद्तीने नियोजन करुन कामे करीत आहोत.सदस्य बावनथडे यानी केलेले आरोप चुकीचे असून त्यांच्या क्षेत्रातील कामांचेही नियोजन केलेले आहे.ते सदस्य असून स्वतःच काम करीत असल्याने काही कामांच्या बाबतीत त्यांना बोलल्यामुळे त्यांनी मनात राग धरला असावा अशी प्रतिक्रिया कनिष्ट अभियंता प्रविण दमाहे यांनी दिली.