देवरी,ता.२९:- देवरी तालुक्यातील भोयरटोला (टेकाबेदर) येथील अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने येत्या मंगळवार (दि. ३१) ते बुधवार (दि. ०१ जानेवारी) रोजी येथील ग्रामपंचायत परिसरातील मंदिरामध्ये विठ्ठल रूखमीनी मंदिर व रा.सं तुकडोजी महाराज मंदिर येथे मुर्तीची ज्योत प्रज्वलीत आणि मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५६ वी पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात मंगळवारला सकाळी ७.३० वाजता ज्योत (दिप) प्रज्वलन गुरूदेव सेवा मंडळ, देवरीचे दयाराम लांजेवार यांच्या हस्ते आणि अर्बन बेंक देवरी चे व्यवस्थापक बि.जी येल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या प्रसंगी पिंडकेपार चे ग्रा.पं. सदस्य टिकेश्वर राऊत,गुरूदेव सेवा मंडळ देवरीचे कुलदीप लांजेवार,पिंडकेपारचे महाराज अशोकराव बागळे,लिमदास गणवीर, टेकाबेदरचे पो. पाटील विश्वनाथ राऊत, रामेश्वर कुमोटे, यांच्यासह श्री गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व महिला भजन सेवा मंडळाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित रहणार आहेत. तसेच सायंकाळी प्रार्थना व हरिपाठ आणि रात्री ८.३० वाजता गोरेगावं येथील ह.भ.प. निर्मलदास सोनवाने महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम तर बुधवारी सकाळी ८ वाजता गडचिरोलीचे सुखदेव वेठे महाराज यांच्यावतीने ग्रामगीता वाचन व रामधून आणि किर्तन व गोपालकालाचा कार्यक्रम तर दहिहांडी कार्यक्रमाचे उद्घाटन या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आणि देवरीचे सामाजीक कार्यकर्ता यादोराव पंचमवार यांच्या अध्यक्षते खाली व देवरीचे जयहो अग्रवाल यांच्या उपाध्यक्षते खाली पार पडणार आहे. यावेळी देवरीचे सेवानिवृत्त प्राचार्य के.सी.शहारे, जि.प.चे सभापती सविता पुराम, गडचिरोलीचे सुखदेव वेठे महाराज व देवरीचे संतोष शाहू यांच्यासह श्री गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व महिला भजन सेवा मंडळाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित रहणार आहेत.
तरी या कार्यक्रमात परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्यानीराम येल्ले, अनिल भंडारी,राधेश्याम लटये,अध्यक्ष भागरता येल्ले व सचिव पुष्पा फरदे यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी. व सदस्यांनी केले आहे.