गोंदिया,दि.२९ः- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित जी.ई.एस हाईस्कूल व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, रावनवाड़ी येथे तिन दिवसीय वार्षिक स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाला. तीन दिवसीय वार्षिक स्नेह सम्मेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक स्पर्धा, गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शासकीय सेवांमध्ये विविध पदावर सेवा देणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
शाळा व महाविद्यालयाची प्रगती व उन्नती करण्याचे ध्येय असले पाहिजेत. कौशल्यपूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यात आपली सर्वोच्च तत्परता व प्रथम प्राथमिकता असेल तर आज स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी हा उद्याचा भविष्य निर्माता होवू शकतो. विद्यार्थ्यांच्या अंगी आलेल्या सुप्त गुणांना व त्यांच्या कलेला प्रदर्शित करण्याचे काम शिक्षकांसह आपण सर्वांचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व विविध साधनांची सुविधा व योग्य संस्कार देण्याचे काम पालकवर्ग व शिक्षकांनी करावे असे प्रतिपादन संस्था सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
स्नेह संम्मेलनाला सर्वश्री राजेंद्र जैन, वैशालीताई पंधरे, शीलाताई वासनिक, विनोद पटले, गेंदलाल शरणागत, सुरजलाल हरिणखेडे, गेंदलाल बिसेन, आनंद लांजेवार, अनिल गजभिये, रेखाताई लिल्हारे, कल्पना बिसेन, पन्नालाल हरिणखेडे, शीलाताई हरीणखेडे, रेणुकाताई मानेकर, प्रतिमाताई बिसेन, वाघारेताई, सुनील पटले, रौनक ठाकुर, रजनीताई प्रजापती, पद्माताई कुंजाम, माधुरीताई पटले, विकास गेडाम, तिलक भगत, सी.बी.बिसेन, चित्रिव सर, बी ए राऊत, रेखलाल तुरकर, छायाताई पटले, सरिताताई कटरे, आशिष बरईकर, ज्योतीताई हरीणखेडे, रणजीत वासनिक सहित पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.