अर्जुनी मोर.: तालुक्यातील साकेत बुद्ध विहार सिरोली/महागाव येथे दि.०१ जानेवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मुर्त्यांचा अनावरण सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्याचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले आणि जि.प.गोंदिया उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांच्या हस्ते होणार आहे. पूर्णाकृती मुर्त्यांचा अनावरण सोहळ्याच्या अनुषंगाने तीन दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडणार आहेत.या मार्गदर्शन सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक, वक्ते प्रा.डॉ.आदे इतिहास विभाग प्रमुख गोविंदराव मुणघाटे विद्यालय कुरखेडा आणि प्रा.मुन्नाभाई नंदागवळी आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक गोंदिया हे राहणार आहेत.
त्यानंतर ता.०२ जानेवारीला रात्रीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुला मुलींसाठी ठेवण्यात आले आहे.त्यामध्ये सामाजिक प्रोत्साहन पर प्रथम बक्षीस १५०० रुपये, द्वितीय १०० रुपये, तृतीय ७०० रुपये, प्रोत्सांपर बक्षीस २०० रुपये प्रत्येक ग्रुपला देण्यात येणार आहे.०३ जानेवारीला सकाळी ११:०० वाजता व्याख्यान व बक्षीस वितरण ३:०० वाजता धम्म रॅली, ७:०० वाजता सामुहिक भोजनदान त्यानंतर रात्रीला भिमाचा वाघ म्हण रे संगीतमय धम्म प्रबोधन विकास राजा नागपूर हे करणार आहेत.रामकृष्ण शेंडे मूर्ती दान दाते, प्रमोद मेश्राम मूर्ती दान दाते, राजकुमार बडोले नवनिर्वाचित आमदार अर्जुनी मोर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यशवंत सोनटक्के,दिनेश पंचभाई, दानेश साखरे ,अजय लांजेवार, सुगत चंद्रिकापुरे, डॉ.भारत लाडे,अतुल कडवे एस.व्ही.आय.कुही,सविता कोडापे सभापती पं.स.अर्जुनी मोर,होमराज पुसतोडे उपसभापती पं.स.अर्जुनी मोर,यशवंत परशुरामकर सभापती कृ.बा.स. अर्जुनी मोर,अनिल दहिवले उपसभापती कृ.उ.बा.समिती, पिंटू मंडल वैद्यकीय अधिकारी,भीमराव खोब्रागडे, राज रामटेके, जे.के.काळसर्पे प्राचार्य.बी.जी.पटले प्राचार्य, विजय कापगते,डी.आर. अवसारे ग्रा.अ.कविता कापगते सदस्य जि.प.गोंदिया, जयश्री देशमुख सदस्य जि.प.गोंदिया, पोर्णिमा ढेगे जि.प.गोंदिया,प्रमोद लांडगे सदस्य प.स.अर्जुनी,नाजूक लसूणते सरपंच शिरोली,सुधीर मेश्राम उपसरपंच,प्रभाकर कोवे सरपंच, मोहन साखरे सरपंच,सतीश कोसरे पो.पा.शिरोली, लोकेशन मेश्राम गोंदिया,एस.आर.रामटेके प्रा.स्वा, लायकराम भेडारकर , व्यंकट खोब्रागडे संचालक, उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, सोमेश्वर सोंदरकर,पिंटू आकरे,वर्षा घोरमोडे,एस.कुमार शहारे नगरसेवक,मंजुषा बारसागडे,प्रदीप मस्के,बालू नेवारे मोरगाव,संतोष रोकडे,सुरेंद्रकुमार ठवरे, छगन साखरे सदस्य महागाव यांच्या उपस्थित पार पडणार आहे.