भाजपाची नविन सदस्यता मोहीम शिघ्र गतीने राबवा :- ॲड.येशुपाल उपराडे

0
68

अर्जुनी मोर.–गावपातळीवरील बुथ कार्यकर्ता हा भारतिय जनता पक्षाचा आधारस्तंभ आहे. बुथलेवल पासुन तालुका ,जिल्हा,तसेच प्रदेश व राष्टीय लेवलच्या पदाधिका-यांच्या परिश्रमामुळेच भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दर तीन वर्षांनी पक्षाच्यावतीने नवीन सदस्यता मोहीम राबविली जाते. डिसेंबर महिन्यात भाजपा सदस्यता मोहिमेला सुरुवात झाली. गोंदिया जिल्ह्याला दोन लाख 52 हजार नवीन सदस्य नोंदणीचे प्रदेशाच्या वतीने उद्दीष्ट देण्यात आले आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 50 हजार नवीन सदस्य नोंदणी उद्दिष्ट पूर्तीसाठी भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने या अभियानात सहभागी होऊन नविन सदस्यता मोहीम यशस्वी करावे. प्रत्येक बुथवर दोनशे नवीन सदस्य नोंदणीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. सदर नोंदणी अँड्रॉइड मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे. सक्षम भाजपा समृद्ध भाजपा,आगामी काळात शत प्रतिशत भाजपा हा उद्देश सफल करण्यासाठी या अभियानाची व्याप्ती आवश्यक आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे अभियान लाभदायक ठरणार आहेत. महिला मोर्चा,युवा मोर्चा यांची जबाबदारी अभियानात महत्वाची आहे.असे आवाहण भाजपाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष ॲड.येशुपाल उपराडे यांनी केले आहे.
भाजपा तालुका अर्जुनी मोर.ची संघटनात्मक बैठक 29 डिसेंबर ला खरेदी विक्री समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली.त्यावेळी विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष ॲड.येशुपाल उपराडे बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते होते.यावेळी जेष्ठ भाजपा नेते तथा खरेदी विक्री समिती अध्यक्ष केवळराम पुस्तोळे,प्रदेश महिला मोर्चा महामंत्री तथा जि.प.सदस्य रचनाताई गहाणे,जि.प.सदस्य जयश्री देशमुख,भाजपा जिल्हा महामंत्री तथा पं.स.सदस्य डाॅ.नाजूक कुंभरे, पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोळे, तालुका महामंत्री तथा पं.स.सदस्य नुतनलाल सोनवाने,भोजराज लोगडे,महिला मोर्चा जिल्हा महामंत्री ममता भैय्या,नगर पंचायत उपाध्यक्ष ललिता टेंभरे,नगरसेवक राधेश्याम भेंडारकर, संजय खरवडे, सपना उपवंन्सी,व अन्य भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थीत होते.
गोंदिया जिल्ह्यात भाजपाचे संघटन शक्तीमुळे महायुतीचे चारही आमदार निवडुन आले.त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.येशुपाल उपराडे यांचा अर्जुनी मोर. तालुका भाजपाचे वतीने शाल श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते,संचालन तालुका महामंत्री भोजराज लोगडे,आभार नपं सभापती राधेश्याम भेंडारकर यांनी केले.