मिश्रा यांच्या हस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
47

गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक 17 श्रीनगर वॉर्ड येथील जैतवन बौद्ध विहार समोर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन सोमवार, 30 डिसेंबर रोजी माजी नगरसेविका निर्मला दिलीप मिश्रा यांच्या हस्ते पार पडले. सदर रस्त्याचे बांधकाम जैतवन बौद्ध विहार ते सुनील सहारे तसेच सहारे यांच्या घरापासून ते जांभुळकर यांच्या घरापर्यंत करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक विनीत शहारे, सुनील शहारे, डॉ. शशिकांत भादूपोते, मदन भीमटे, हरीश चांदवानी, पंकज मिश्रा, किशन वाघमारे, अनील नंदेश्वर, वंजारी भाऊ, पंजवानी ताई, माने ताईसह वार्डातील नागरिक उपस्थित होते.