लोंढोली येथे संताजी सोशल फाऊंडेशनच्यावतीने गुणवंताचा सत्कार

0
29

सावली,दि.०१ जानेवारीः- तालुक्यातील लोंढोली येथे संताजी सोशल फाउंडेशन सावली द्वारा आयोजित येथे तेली समाज एकता महासंमेलन व भव्य दिव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर होते.तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य हे उपस्थित होते.या कार्यक्रमात सत्कारमूर्ती जितुभाऊ वैरागडे सहायक पोलीस निरीक्षक नागपूर, विशेष अतिथी प्रकाशभाऊ देवतळे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,हरिश्चंद्र दहागाणे नागपूर जिल्हा संघटक, बाबुरावजी कोहळे, प्रभाकरजी वासेकर, रमेशजी बारसाकडे,संजयजी कुणघाडकर इत्यादी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तालुका अध्यक्षा वैशालिताई कुकडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष कुनघाडकर यांनी मानले.सूत्रसंचालन संचालक रुपेश किरमे यांनी केले.