गोंदियात यंदा ’चला व्यसन बदनाम करू या’ अभियान
गोंदियाः गेल्या काही वर्षात 31 डिसेंबरला सेलीब्रेशनच्या नावाखाली खास करून तरूण पिढीत मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरूण-तरूणी या दिवशी व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा याच पाष्र्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस आणि एम. जी. पॅरामेडीकल काॅलेजच्या माध्यमातून ’चला व्यसन बदनाम करू या’ यावर जनजागृती रैलीची सुरूवात सिटी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर पर्वते यांनी हिरवी झंडी दाखवुन व दारूच्या प्रतिकात्मक राक्षसाला चप्पल मारून केली. ही रैली एम. जी. पॅरामेडीकल काॅलेज पासुन मुर्री चैकी, चंद्रशेखर वार्ड, श्रीनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर होत परत काॅलेजला येवून दारूच्या प्रतिकात्मक राक्षसाचा दहन करण्यात आला. रैली दरम्यान प्रत्येक चैकात नागरिकांना दुधाचे मोफत वाटप देखील करण्यात आले. नववर्षाच्या स्वागता दरम्यान तरूणाईत प्रचंड उत्साह असतो. मात्र काही तरूण दारू प्राशन करून धिंगाना घालतात. यामुळे वाद विवाद होऊन गावातील व परिसरातील वातावरण कलुषित होते असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला समाजसेविका सविताताई बेदरकर,जयंत शुक्ला, संविधान बचाव मंचचे अतुल सतदेवे व महिला अत्याचारवर मार्गदर्शन करणारी समाजसेविका रजनी रामटेके हे उपस्थित होते. या कार्यक्रमात नागरिकांना दारूमुळे उदभवनारे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन केले.
या मोहिमेंतर्गत कार्यक्रमाची सुरूवातीला समाजसेविका सविताताई बेदरकर यांनी सांगीतले की कोणत्याही अंमली पदार्थाचे व्यसन हे वाईटच असते . एम. जी. पॅरामेडीकल काॅलेजमध्ये तरूणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असुन प्रशिक्षण घेतलेले युवक-युवती समाजात व्यसन विरोधी पोस्टर प्रदर्शन, परिसरात व्यसनविरोधी प्रभातफेरीचे आयोजन, दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन, व्यसन विरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्सवर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच सोशल मीडियामध्ये व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे, असे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातिल नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्ज केली.
प्राचार्य श्रीमती अनुसया लिल्हारे, प्रा. प्रिती वैद्य, प्रा. ललित डबले, प्रा. छाया राणा, प्रा. रामेश्वरी पटले, प्रा. आरती चैधरी, प्रा. मनीष चैधरी, प्रा. गायत्री बावनकर,राजू रहांगडाले, सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये यांचा उपस्थित पार पडला. तसेच या प्रसंगी एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजचे विद्यार्थी स्वयंशासन कार्यक्रमात सहभागी झाले व इतर विद्याथ्र्यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमाचे संचालन शिवानी बघेले यांनी केले व आभार प्रदर्शन प्राचार्य अनुसया लिल्हारे यांनी केले.31 डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी शासन देते. हे व्यसनाला बढावा देणारे धोरण शासनाने थांबवावे असे कार्यक्रमाचा माध्यमातून संदेश देण्यात आले आहे.