ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन
भंडारा, दि.2: वाचनामुळे सर्वांगीण विकास होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचनाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी, विचारशक्तीचा विकास, आणि संवाद कौशल्ये सुधारतात.त्यामुळे ग्रंथाशी मैत्री करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी आज केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा द्वारा आयोजित “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी या वाचन पंधरवडानिमित्त “ग्रंथ प्रदर्शन” हा कार्यक्रम आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.त्या वेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. स्मिता बेलपत्रे यांनी विद्यार्थ्यांना दररोज वाचन करण्याचे आवाहन केले आणि वाचनामुळे जीवनात येणाऱ्या सकारात्मक बदलांची माहिती दिली.
कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी या उपक्रमामुळे भंडारा जिल्ह्यात वाचन संस्कृतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी वाचनाचा संकल्प केला आणि भविष्यात वाचनाची सवय जोपासण्याचे वचन दिले. वाचनाच्या कौशल्याने उपजीविकेच्या संधी मिळतील,असे सांगितले
मुलावर व बाल मनावर वाचनाचे लहान वयात संस्कार होतात.मात्र वाचनाचा व्यासंग वाढवला पाहिजे.तसेच मुद्रीत माध्यमामुळे वाचलेले मेंदुत पक्के होते.समाजमाध्यमांच्या अतिभडीमारामुळे वाचन विस्मरणात जात असल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या.तसेच वाचन संकल्पात सहभागी होवून नव्या वर्षाची सुरूवात करून वाचनाला वाढवावे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी, भंडारा खोमेंद्र बोपचे यांनी 1 ते 15 जानेवारी दरम्यान वाचन संकल्प अभियान राबवीण्यात येत आहे .
तर वाचन संकलप अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातील कार्यक्रमांचे माहिती दिली. वाचन संकल्प अभियानामध्ये सामूहिक वाचन कथाकथन तसेच आणि उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले .संचालन व आभार ग्रंथालय सहायक श्री. नारनवरे यांनी केले.कार्यक्रमाला अभ्यासीकेचे विदयार्थी,नागरिक उपस्थित होते.