आलेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
234

देवरी,दि.०३- तालुक्यातील आलेवाडा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शुक्रवारी (दि.०३) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग १० वीची विद्यार्थिनी दामिनी मनोजकुमार बडोले  ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उर्वशी राजेश राऊत,प्रज्ञा सुभाष कऱ्हाडे ह्या उपस्थित होत्या.

या प्रसंगी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांचे स्वयंशासन घेण्यात आले. स्वयंशासनामध्ये एकूण 55 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घडवून आणला.

कार्यक्रमाचे संचलन साक्षी राजेंद्र चौरे आणि सुनैना खेलावन गजपल्ला या विद्यार्थिनींनी केले. उपस्थितांचे आभार प्रतीक्षा जितेंद्र शहारे या विद्यार्थिनींनी मानले. संपूर्ण कार्यक्रम जितेद्र श्री..वासनिक संचालक मा. वि. शिक्षण संस्था लाखनी, मुख्याध्यापक श्री व्ही.झेड.गिऱ्हेपूजे तसेच सांस्कृतिक प्रमुख कु. एम.बी.वाघमारे स.शि. व श्री आर.ए. कऱ्हाडे स.शि. व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिक करण्यात आला होता.