अर्जुनी मोरगांव : आता हिवाळा ऋतू सुरू आहे आणि या दिवसात गावामध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार नसून मोलमजुरी करणारी गोरगरीब जनता हि आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी हाताला काही रोजगार मिळण्याकरिता मोठया प्रमाणात परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करू लागल्याने अर्जुनी मोरगांव तालुक्यातील खांबी येथे ता.२ जानेवारी २०२५ पासून रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
खांबी येथील रोजगार हमी योजनेच्या कामावरती मोठया प्रमाणात महिलांच्या उपस्थितीत ता.३ जानेवारी भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच निरूपा बोरकर, तंटामुक्त अध्यक्ष विकास डुंबरे, ग्रा.पं सदस्य शालू खोटेले, माजी ग्रा.पं सदस्य सरीता कोसरे, रोजगार सेवक लीलाधर राऊत, व्ही. के. सोसायटी अध्यक्ष नामेश्वर खोटेले, ग्रा.पं संगणक चालक योगेश लोणारे, सपना उरकुडे, राहुल ब्राम्हणकर, कमलेश शेंडे आदी प्रामुख्याने मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाटचारी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून गावातील गोरगरीब जनता हि परराज्यात भटकंती करत जाऊ नये म्हणून खांबी या गावातील नागरिकांच्या हाताला काम देण्यात आले आहे.