अर्जुनी मोर.: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना/बाक्टी येथे दि.३ जानेवारी २०२५ रोजी गरोदर माता आणि मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी कुटुंब नियोजन शस्त्रकियेसाठी चार लाभार्थ्यांना भरती करण्यात आले असून ता. ४ जानेवारी रोजी कुटुंब नियोजन शिबीर ठेवण्यात आले आहे. सदर शस्त्रक्रियेचे सर्जन हे ऑर्थोपेडीक सर्जन (MBBS, MS) डॉ. पॉल सर आहेत.
ता.४ जानेवारी आयुष्मान भव अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर “माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा ” या थीम नुसार शिबीर घेण्यात येणार असून यामध्ये आरोग्य तपासणी, निदान, उपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे.गरोदर माता शिबीराला २९ माता व ९ स्तनदा माता व नवजात बालक यांना तंज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषध उपचार करण्यात आले. यावेळी स्त्रीरोगतंज्ञ डॉ.नाफडे व बालरोगतंज्ञ डॉ. मनोज डोंगरवार यांनी तपासणी केली.
कमी वजनाचे बाळ आणि सिकल सेल, थॅलेसेमिया असलेल्या मातांना संदर्भित करण्यात आले. यावेळी जास्त रक्तदाब असलेल्या माता यांना सुद्धा औषधोपचार सुरू करून संदर्भित केले. कमी वजनाचे बाळ असल्यास डॉप्लर सोनोग्राफीकरिता ज्याठिकाणी मशीनची उपलब्धता आहे त्याठिकाणी संदर्भित केले.मानसिक रुग्णांनी ओपीडी मध्ये एकूण १४ रुग्णांनी लाभ घेतलाके .टी.एस मानसिक चमू गोंदिया वरून ओपीडी करीता आली असून काउन्सेलर अमित वागडे, क्लिनीकल साइकोलोजिस्टर दिपक अगुलवार, सोशल वर्कर मिना रेवटकर, साइकाइट्रीक नर्स हर्षा साखरे यांनी औषधउपचार, व समुपदेशन केले.डॉ. श्वेता कुलकर्णी आणि डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी गरोदर मतांची तपासणी करून सहकार्य केले.