गोंदिया,दि.०७ःगोंदिया जिल्हा परिषदेच्या मार्फत अनुकंपा तत्वावर विविध ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांची भेट घेत पारदर्शकता राखून ती यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले.अध्यक्ष रहागंडाले यांनी सर्व अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नव्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना केली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी ग्रामविकासाच्या कार्यात उत्कृष्ट योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.