१०० दिवसीय क्षयरोग “मोहिम पहिल्या तीस दिवसातच 191 सहव्याधी प्रवाहात

0
53

गोंदिया,दि.१०ः सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियत्रंण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाच्या वतीने १०० दिवसीय क्षयरोग ” मोहिम दि.७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ कालावधीत राबविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी प्रजित नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्या मार्गदर्शनात मोहिम यशस्वी राबविण्यात येत आहे.या १०० दिवसीय क्षयरोग “मोहिमेतंर्गत

पहिल्या तीस दिवसातच 51292 सहव्याधी लोकांची तपासणी करण्यात आली असुन 879 निक्षय शिबीरा दरम्यान 3890 एक्स-रे व 3594 थुंकी नमुने तपासणीअंती 191 लोकांना क्षयरोगविरोधी औषधी सुरु करण्यात आली असल्याची माहीती डॉ.अभिजीत गोल्हार यांनी सांगितले आहे.
या मोहिमेत शिबिराद्वारे समाजातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, भुक मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत आहे.
7 डिसेंबर पासुन 100 दिवस राबविण्यात येत असणार्या मोहिमेत जिल्ह्यातील आरोग्य विभाग व क्षयरोग विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी,आशा सेविका,आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक यांच्या सर्वांच्या प्रयत्नात गातपातळीवर अतिजोखमीच्या सहव्याधी लोकसंख्येची शोध मोहीम राबविण्यात येत असुन एक्स-रे वाहनद्वारे मोफत एक्स-रे शिबीरे आरोग्य संस्थेत होत आहे. संशयित रुग्णांचे जिल्ह्यातील अत्याधुनिक सीबीनँट केंद्र व आरोग्य संस्थेतील प्रयोगशाळेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचे मार्फत थुंकी नमुने तपासणी करुन फार्मासिस्ट,क्षयरोग पर्यवेक्षक,टिबीएचव्ही,कार्यक्रम समन्वयक यांच्या सहकार्याने एक्स-रे/थुंकी दुषित रुग्णांना क्षयरोगविरोधी औषधी सुरु करण्यात येत असल्याची माहीती डॉ.गोल्हार यांनी दिली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी यांचे नियोजन सोबत डॉ.वेदप्रकाश चौरागडे व देव चांदेवार यांचे सनियत्रंण व पर्यवेक्षण या कामी मोलाचे ठरत आहे. जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे यांचे जनजागृती अविरत सुरु आहे.