गोरेगाव–तालुक्यातील तेलनखेडी येथे जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनेश भाऊ बहेकार (अध्यक्ष शा. व्य. समिती तेलनखेडी) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक केशव भाऊ बिसेन (सरपंच,पलखेडा), दिपप्रज्वलक रवींद्र बहेकार ( उपसरपंच तेलनखेडी ),सहदिपप्रज्वलक राजेश बहेकार , प्रमुख अतिथी सुखरामजी कटरे, प्रभुजी शहारे ,लकीरामजी सिंदराम ,कुवरलालजी कोरोटे व कु. आर. व्ही .जोशी मॅडम (केंद्रप्रमुख मोहगाव ति.) हे होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तसेच दिनांक १० जानेवारी २०२५ ला ‘सखी’ महिला मेळाव्याचे आयोजन कल्पनाताई बहेकार( मा सरपंच,चोपा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. वर्षाताई पटले (सरपंच, निंबा) दिपप्रज्वलक सौ. बबीताताई मेश्राम (मा. ग्रामपंचायत सदस्य तेलनखेडी), प्रमुख अतिथी मंगेशाताई मेश्राम,सौ.भूमेश्वरीताई बिसेन ,कु.जोशी मॅडम, कु. शितल चौरसिया,सौ.मंगलाताई बिसेन,सौ.डिंपल हुकरे व कु. नेहा दांडेकर यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी सरपंच वर्षाताई विजय पटले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त बचत करावी. वेळेच्या सदुपयोग करावा ,आरोग्याचे जतन करावे, तसेच घर आंगण व परिसर स्वच्छते बद्दल जाणीवपूर्वक काम करावे, आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे व त्यांना पाहिजे तेवढाच मोबाईलचा वापर करू द्यावा , त्यांना मोबाईल पासून थोडा दूर ठेवावे. प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनून आपला जीवन सुखमय समृद्ध कसा होईल याच्याकडे नेहमी वाटचाल करावी. तसेच प्रत्येक गावामध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. त्यामधून प्रत्येक महिलेला आपले आचार विचार व्यक्त करता येतात आलेल्या व्यक्तींपासून काहीतरी बोधात्मक गोष्टी भाषणाच्या माध्यमातून ऐकता येतात त्यातूनच चांगल्या गोष्टीची जाणीव होते.याबाबत सविस्तर उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
महिलां मंचातील महिलांनी विविध कला गुण सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी. भिमटे (स.शि. तेलनखेडी) यांनी तर आभारप्रदर्शन भारती मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमासाठी सर्व महिला भगिनी, ग्रामपंचायत तेलनखेडी येथील सर्व पदाधिकारी, कर्मचारी,जि. प. व.प्राथ. शाळा तेलनखेडी येथील सर्व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व पालक यांचे सहकार्य लाभले.