पंचशील विद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हात प्रथम राज्यस्तरावर करणार गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व

0
1167

अर्जुनी मोरगांव –तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथील विद्यार्थिनी देवयानी दिलीप किरसान वर्ग १० वी तील विद्यार्थिनी सहाय्यक शिक्षक एस.सी पुस्तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये आदिवासी गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून आता ही विद्यार्थिनी गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व राज्यावर करणार आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातून विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर सरस्वतीबाई महिला विद्यालय गोंदिया येथे दिनांक ९ व १० जानेवारी रोजी झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये पंचशील विद्यालय बाराभाटी येथील विद्यार्थिनी देवयानी दिलीप किरसान या विद्यार्थीनींनी शाळेतील सहाय्यक शिक्षक एस.सी पुस्तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडच्या काळात वाढत्या वाहनामुळे तसेच ओव्हरटेक करतांना रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी कार किंवा इतर वाहनात सेंसरच्या मदतीने दोन्ही वाहन चालकास कसे सावधान करता येतो यावर आधारित मॉडेल तयार करून प्रत्यक्षात उत्कृष्ट सादरीकरण करीत देवयानी किरसान या विद्यार्थिनीने आदिवासी गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल परीक्षकाकडून या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.