जंगले जगली तरच माणूस जगेल- माधुरी कुंभरे

0
9

देवरी- ग्राम पंचायत ककोेडी आणि जिल्हा परिषद हायस्कूल ककोडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या मंगळवारी (ता.१९) वृक्षारोपण व संगोपन या विषयावर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ककोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि.प. सदस्य माधुरी कुंभरे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सभापती सविता पुराम, प्रवीण दहिकर, रियाज खान आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान तीन हजार वस्तीच्या ककोडी या गावात तीन हजारावर रोपट्यांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी गावकèयांनी उचलली आहे. यावेळी मान्यवरांनी झाडे लावलीच पाहिजेत, पण त्याही पेक्षा ती जगविली पाहिजेत. जंगले जगली तरच पर्यावरण टिकेल आणि पर्यावरण टिकले तरच माणूस जगेल असा मौलिक सल्ला सौ. कुंभरे यांनी उपस्थितांना दिला. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी सुद्धा समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन श्री आंधळे यांनी केले.