दिवाळीदरम्यान गोंदिया-संतरागाछी दरम्यान स्पेशल ट्रेन

0
16

गोंदिया,दि.21 :येत्या दिवाळीदरम्यान प्रवाशांची अत्यधिक ये-जा व सुट्टय़ा लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे विशेष ट्रेन (0८0४३) संतरागाछी-गोंदिया स्पेशल ३ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.
ही गाडी संतरागाछीवरून दर सोमवारी दुपारी २.५0 वाजता सुटेल तर मंगळवारी सकाळी ६.0५ वाजता गोंदियात पोहोचेल. तसेच ट्रेन (0८0४४) गोंदिया-संतरागाछी स्पेशल ४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २0१६ पर्यंत गोंदियावरून दर मंगळवारी १२.४0 वाजता सुटेल व बुधवारी सकाळी ६.१0 वाजता संतरागाछी पोहोचेल.
या गाडीत एकूण १८ कोच राहतील. यात १0 तृतीय श्रेणी वाताणुकूलीत, सहा द्वितीय श्रेणी वाताणुकूलीत व दोन एसएलआर कोच राहतील. ही ट्रेन खडकपूर, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग व राजनांदगाव स्थानकांवर थांबेल. तसेच संतरागाछी ते पुणेच्या दरम्यानसुद्धा ८ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २0१६ पर्यंत स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. ट्रेन (0२८२२) संतरागाछीवरून दर शनिवारी सायंकाळी ६.३0 वाजता सुटेल व सोमवारी पहाटे २.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. तसेच ट्रेन (0२८२१) पुणे-संतरागाछी स्पेशल १0 ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत पुणेवरून प्रत्येक सोमवारी सकाळी १0.३0 वाजता सुटेल व मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता संतरागाछी येथे पोहोचेल.
गाडीचा (0२८२२) नागपूर येथे आगमन/प्रस्थान ११.१५/११.२५ वाजता (रविवार) तथा गाडीचा (0२८२१) नागपूर येथे आगमन/प्रस्थान १.२0/१.३0 वाजता (मंगळवार) राहील. या गाडीत एकूण १३ कोच राहतील. यात आठ तृतीय श्रेणी वाताणुकूलित, तीन द्वितीय श्रेणी वाताणुकूलित व दोन एसएलआर कोचचा समावेश राहणार आहे.
ही गाडी खडकपूर, चक्रधरपूर, राहुरकेला, झारसुकडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, भुसावळ व सूरत आदी स्थानकावर थांबेल, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे. (