श्री बजरंग मानस मंच ककोडीच्यावतीने खा.किरसान यांचा सत्कार

0
33

देवरी,दि.१४-ः तालुक्यातील ककोडी येथे श्री बजरंग मानस मंच ककोडी द्वारा आयोजित “माणस महाकुंभ व कलश यात्रा” कार्यक्रमात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खासदार किरसानी यांनी सत्कारपर मार्गदर्शन करीत विकासाच्या वाटेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी मोतीलाल पीहदे, सचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया इसुलाल भालेकर, पंचायत समिती सदस्य रणजीत कासम, माजी सरपंच रियाज खान, उपसरपंच भैय्यालाल जांभुळकर, जीवन सलामे, अमरदास सोनबोहर, धनु शनीचरा, मनीष मोटघरे, मनोज नांदणकर, गोविंद बनसोड, श्यामलाल कपूरडे, सौ.कुलहार प्रधान, नंदू पुरी, भुवन घाटा, मोनू मोहबसी पदाधिकारी कार्यकर्ता व जनसमुदाय उपस्थित होते.