स्वामी विवेकानंद जयंतीनिमीत्त नमाद महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम साजरा

0
126

गोंदिया, दि.14 : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय द्वारा संचालीत नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट नमाद महाविद्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमीत्त नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या (नमाद) सभागृहात पोस्टर स्पर्धा व व्याख्यान स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

        कार्यक्रमाचे आयोजन नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे व राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बबन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

       कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.तारेंद्र पटले, विधी विभागप्रमुख डॉ.सुयोग इंगळे, प्रा.रवीकुमार रहांगडाले, युवा सामाजिक कार्यकर्ते निखील बंसोड, राज्यस्तरीय भाषण स्पर्धा पुरस्कारप्राप्त मौसम पटले, रासेयो स्वयंसेवक हर्ष बावणकर उपस्थित होते.

       यावेळी माजी रासेयो जिल्हा समन्वयक डॉ.बबन मेश्राम म्हणाले, स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक होते. आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील आदर्शातून प्रेरणा घेऊन राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच प्रत्येक युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे आदर्श अंगीकारुन पुढील वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले. प्रा.तारेंद्र पटले यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक योगदानावर प्रकाश टाकला. स्वामीजींनी भारतीय सांस्कृतिक मुल्यांची जागतिक स्तरावर स्थापना कशी केली याबाबत सविस्तर माहिती विशद करुन आजचा तरुण भारत निर्माण करावा असे आवाहन केले.

        युवा सामाजिक कार्यकर्ते निखील बंसोड, मौसम पटले, हर्ष बावणकर यांनी कार्यक्रमादरम्यान पंचपरिवर्तन या संकल्पनेवर चर्चा केली. समारोपीय कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        सदर कार्यक्रमामुळे तरुणांना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी जोडण्याची आणि त्यांचे आदर्श आत्मसात करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृतिका कनोजिया यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ईशा सातभावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृतिका कनोजिया, युवा स्वयंसेवक पुनम दमाहे, ईशा सातभावे, निखील बंसोड, मौसम पटले, हर्ष वावणकर, विनय मेंढे, दिप्तेश फुकटकर, आर्या चौव्हाण, भूमेश्वर खोब्रागडे, प्रणाली बंसोड, पुजा गोंधुडे, मनिष दहीकर, आराज्ञा शरणागत व रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.