५५ लाखांने केली होती बांधकाम उद्योजकाची फसवणूक
अकोला : बाळापूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी तथा मुंबई नवीन पनवेल येथील प्रख्यात बांधकाम उद्योजक तुकाराम दुधे याची ५५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी हॅश म्हणजे राखाडी उचणारे कंत्राटदार फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी व महाजनको (Paras Project) पारस औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) योगेश राधेश्याम पटीये यांच्याविरुध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे.
मुंबईतील बांधकाम उद्योजक तुकाराम दुधे यांची पोलिसांत तक्रार
या गुन्ह्यातील कंत्राटदार अन्सारीला पोलिसानी अटकदेखील केली आहे. (Paras Project) महानिर्मिती औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांनी पटीये याना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. ३० टक्के भागीदार म्हणून ५५ लाख २९ हजार रुपये मे. साई अॅश पॉइ ट्रान्सपोर्टिंग कंपनीच्या बँक खात्यावर स्वीकारली. त्यानंतर त्याने महाजनकोमधून ४१९ रुपये दराने राखाडी विकत घेऊन ती पुढे ५४० रुपये या दराने विक्री करून एकूण ९ हजार २४६ मॅट्रिक टन राखाडी विकली आणि दुधे यांनी गुंतवलेल्या रकमेवरती कमाई केली.
पनवेल पोलिसांनी केले दोघंविरूध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल
कंत्राटादार फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी याने त्याच्या मेसर्स साई अॅश पॉड ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले असून, टेंडरच्या अनुषंगाने कंपनी १ कोटी ८५ लाख ३९ हजार २०७ इतकी रक्कम भरलेली आहे, असे तुकाराम दुधे यांना सांगितले. त्यानंतर दुधे यांच्याकडून कंपनीमध्ये गुंतवलेल्या ५५ लाख २९ हजार रुपये आणि त्या बदल्यात कोणताही मोबदला न देता तुकाराम दुथे यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी महाजनको (Paras Project) पारस औष्णिक विज केंद्राचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) योगेश पटिये यांच्यासह कंत्राटदार फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी याव्या विरोधात भादवी कलम ४२०,४०६, ३४ नुसार पनवेल पोलीस स्टेशनमध्ये ३० नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कार्यकारी अभियंता पटीयेंची विभागीय चौकशी!
सत्रग्र आपण आपल्या पदावर कायम राहील्यास विभागीय कागपता चौकशीवर महानिर्मिती कंपनीच्या हितसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच आपण चौकशीकामी ४ जानेवारी कर्तव्यावर उपस्थित झाला नाहीत, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे यांना तपासकामी सहकार्य करीत नसल्याने व आदेशाचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे.
पोलिसांचे सूचनेकडे केले दुर्लक्ष !
पारस (Paras Project) येथे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर कार्यरत असताना कार्यकारी अभियंता योगेश पटिये यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे येथे भांदवी ४२०, ४०६, ४६७,४६८.४७५, ३५ अन्वये १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास अनुषंगाने व कंत्राटदार फजल जर रेहमान गुलाम नबी अन्सारी यांना पनवेल पोलिसांनी पारस येथे ४ जानेवारी २०२५ रोजी हजर राहणे अनिवार्य केले होते. ते दोघेही हजर नाही त्यामुळे एकप्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर कारवाई करण्यात आली.
पनवेल पोलिसांनी दस्ताऐवज देण्यास टाळाटाळ !
पनवेल पोलिस स्टेशने सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी यांनी सदर गुन्ह्यांबाबतची अद्यावय माहिती व आजपर्यंत दस्तऐवज मागणी केल्यानुसार त्यांना कार्यकारी अभियंता स्थापत्य पटीये यांनी दिली नाही. सदर गुन्ह्यासंदर्भातील नोटीस बजावूनदेखील कुठल्याही प्रकाराचे उत्तर दिले नाही. तसेच पनवेल पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याचे राहिले नाही.