जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारुप आराखडयाचे योग्य नियोजन करा-प्रजित नायर

0
48

‍‍‍ गोंदियादि.17जिल्हा वार्षिक योजना 2025-26 चा प्रारूप आराखडा सर्व विभागाने सादर केला असून योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले.जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय,  येथील सभा कक्षामध्ये  जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारुप आराखडा संबंधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली . यावेळी ते बोलत होते.

सदर आढावा बैठकीत विविध शासकीय विभागाचे अधिकारी जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा नियोजन अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 चा प्रारूप आराखडा- आपल्या योजनेवर निधी मागणीनुसार सविस्तर माहितीसह तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशनसह उपस्थित राहून आराखडा सादर केला तसेच  जिल्हा नियोजन समितीचे इतिवत्तातील मुददयांचे अनुपालन करून संबंधित कार्यवाही यंत्रणांनी त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

            2025-26 या वार्षिक वर्षाकरीता एकूण 265 कोटी रुपयांची तरतूद असून अंदाजे 198 कोटी रुपयांचे निधी प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी दिली.उर्वरीत शासकीय विभागांनी याबाबत आराखडा तयार करून अहवाल सादर करण्याचे आवाहन मा.जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केले.