27 लाख 9 हजारांचा माल जप्त,अर्जुनी/मोरगाव महसूल विभागाची कार्रवाई

0
478

अर्जुनी/मोरगाव,दि.१९ः- सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अर्जुनी/मोरगाव महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी दि.18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:00 वाजता नवेगाव/बांध येथे पकडून कारवाई केली.याप्रकरणी 27 लाख 9 हजार रूपये किमतीचा माल जप्त केला.यामध्ये ट्रक क्रमांक एम.एच 35,ए.जे 4239  किंमत 27 लाख रुपये तसेच 02 ब्रास रेती किंमत 9 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ट्रक मालक शुभम विलास नागदेवे व ट्रक चालक राहुल सुकाली भोयर रा.कनेरी,ता.सडक/अर्जुनी, जि.गोंदिया यांच्यावर जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दंडात्मक कार्रवाई करुन जप्त केलेल्या ट्रकला तहसील कार्यालय अर्जुनी/मोरगाव येथे जमा करण्यात आले.

तर अर्जुनी/मोरगाव महसूल विभागाने केलेल्या कार्रवाई मुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत.सदरची कार्रवाई अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे,तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात नवेगाव/बांध चे मंडळ अधिकारी उमराव वाघधरे व महसूल सेवक एस.के सांगोळकर यांनी केली आहे.