अर्जुनी मोर.,दि.२१ः- पोलीस उपनिरीक्षक दिपक सखाराम रहिले हे कर्तव्यावर असताना सिंगणडोह मगरडोह याठिकाणी नक्षल्यांनी पेरुन ठेवलेल्या स्पोटात २० जानेवारी २००३ रोजी शहीद झाले.त्या दिवसाची सतत आठवण राहावी म्हणून पोलीस विभागाच्या व ग्रामवासियाच्या विशेष उपस्थित वर्ग 10 व वर्ग 12 विच्या गुणवंताचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेंच शाळेतील मुलांना शहीद पत्नी पुष्पा दिपक रहिले,सागर दिपक रहिले व ठाणेदार योगिता चाफले यांच्या हस्ते शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी छायाताई अमले सरपंच कान्होली,पीएसआय खेडकर,पवणी,जागेश्वर मते उपसरपंच कान्होली,संजय खरवडे,कोदुजी रहिले,दीनदयाल रहिले,ऋणाली रहिले,लताबाई थेर, डाँ युवराज कापगते पो.पा. कान्होली संपूर्ण कान्होली ग्रामवासी मोठया संख्येने उपस्तित होते प्रास्ताविक महेंद्र रहिले यांनी केले.कार्येक्रमाचे संचालन राऊत यांनी तर आभार पुष्पा रहिले व सागर रहिले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मेश्राम ,शैलेश थेर, वैभव रहिले,अतुल रहिले व शहीद रहिले कुटुंबानी अथक परिश्रम केले.