बौद्ध वधु वर परिचय मेळावा उत्साहात,181 उपवर मुलामुलींनी दिला परिचय

0
57

अर्जुनी मोर,दि.२१ः-संबोधी बुद्ध विहार, संविधान चौक, अर्जुनी मोरगाव येथे नुकतेच बौद्ध उपवधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. परिसरातील 181 उपवर वधू वर यांनी मेळाव्याला उपस्थित राहून आपला परिचय सादर केला. सदर परिचय मेळाव्यात अनेक वधूवरांनी आपली पसंती दर्शवून वधू-वर सोबत प्रत्यक्ष बोलनी केले.
बौद्ध समाजामध्ये लग्न जुळविणे ही कठीण समस्या होत बसलेली आहे. वधू वर पाहणे ही तर अतिशय किचकट समस्या निर्माण झालेली आहे. काही अंशी ही समस्या दूर करता येईल का? यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा अर्जुनी मोरगाव च्या वतीने बौद्ध धर्मीय वधु -वर परिचय मेळावा संबोधी बुद्ध विहार, संविधान चौक ,अर्जुनी मोरगाव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याला गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वधू-वरांनी आपली हजेरी लावली. व प्रत्यक्ष परिचय करून घेतला. दरवर्षी असे मेळावे आयोजित करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सोणदास गणवीर यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर.के.जांभुळकर तालुका अध्यक्ष, कल्पना लाडे, उपस्थित होत्या. सदर परिचय मेळाव्यात 181 उप वधू वर यांनी आपला परिचय सादर केला. तसेच भविष्यात असेच नवनवीन उपक्रम राबवावे असे अनेक मान्यवरांनी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन पुनाराम जगझापे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेंद्र खोब्रागडे, श्रीकांत लोणारे सरपंच वडेगाव, जगदीश मेश्राम, मोरेश्वर धारगावे, हिरालाल कोठांगले, नेहरू चव्हाण, त्रिशरण शहारे, रोशन सांगोळे, सुभाष लाडे, शालिक जनबंधू, ज्ञानेश्वर टेंभुर्णे, मंगला बांबोडे, जयश्री खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे यांनी सहकार्य केले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्व उपस्थितांना अल्पपोहार देण्यात आला.