अ.जाती/अ.जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत समाजिक सल्लागार समितीची बैठक उत्साहात

0
18
वाशिम,दि.22 जानेवारी- अ.जाती/अ.जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनीयम १९८९ आणि सुधारित नियम २०१६
नुसार सामाजिक सलोखा वृध्दींगत करण्यासाठी महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे सूचने नूसार वाशिम उपविभागात उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती कड़न दि.२१ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या मुख्य सभागृहात अ.जाती/अ.जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनीयम १९८९ आणि सुधारित नियम २०१६ नूसार सामाजिक सलोखा वृ्धीगत करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 या कार्यशाळेचे प्रास्ताविक तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय अधिकारी तथा दक्षता समितीच्या अध्यक्षा वैशाली देवकर यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रध्दा निमुलन समिती पी.एस. खंदारे‌ यांनी उपस्थितांना पध्दतीने मार्गदर्शन केले. कार्यशाळेला वाशिम ग्रामिण ठाणेदार श्रीमती पाटील, सदस्य सचिव उपविभागीय दृक्षता समिती तथा गविअ पंस वाशिम रविंद्र सोनोने, पीएसआय वाशिम ग्रामिण राहूल गंधे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी/कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि पोलीस पाटील उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे संचालन श्रीराम गवई, सहा.महसूल अधिकारी, उविअ कार्यालय, वाशिम यांनी केले.आभार गजानन इप्पर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनिष वानखेडे, महसूल सहायक तहसील कार्यालय, वाशिम तसेच राहूल धमेरिया सहायक, पंस, वाशिम, सलमान बागवान, तांत्रिक सहायक, उविअ कार्यालय, वाशिम आदींनी पुढाकार घेतला.