अर्जुनी मोर,दि.२३ः-दिव्यांग व्यक्ती हे समाजाचे घटक आहेत.शासनस्तरावर या बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. अनेक संघटनाही आपआपल्या पध्दतीने दिव्यांगांसाठी काम करतात.त्यामुळे एकटेपणाची भावना दुर सारुन मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिव्यांगांनी कठोर प्रयास करीत रहावे.समाजात सन्मान मिळविण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातुन मोठे ध्येय बाळगावे.व आत्मनिर्भर बनावे असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गजानन डोंगरवार यांनी केले.
दिव्यांग कल्याणकारी संघटना गोंदिया शाखा अर्जुनी मोरगावच्या वतीने दि.20 जानेवारीला कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह या ठिकाणी आयोजीत दिव्यांगांना वस्रदान कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणुन बोलत होते. यावेळी समाजसेवक अमिताभ सांतरा नागपूर याचा 58 वा वाढदिवस संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला गजानन डोंगरवार, मोरश्वर बनपुरकर, अर्चना ताई दुणेदार समाजसेवक नागपूर, दिव्यांग कल्याणकारी संघटना जिल्हा सदस्य शमसुन्दर बनसोड आणि शाहबाज़ शेख प्रामुख्याने उपस्थीत होते. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम तसेच या निमित्त तालुक्यातील 100 दिव्यांग बांधवाना कंबल व वस्त्रदान उपस्थित पाहुण्याच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सम्पूर्ण पाहुण्यांनी दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग कल्याणकारी संघटना आणि सम्पूर्ण दिव्यांग बांधवानी अमिताभ सांतरा साहेब यांचे सन्मानाने फुलांचा वर्षाव करीत कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. नंतर सर्व पाहुण्यांच हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून द्विपंप्रजलन करण्यात आले. सम्पूर्ण पाहुण्यांचे दिव्यांग संघटने च्या सर्व दिव्यांगाणी बांधवानी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. संघटनेच्या वतीनी सांतरा साहेब यांच . शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सम्पूर्ण दिव्यांग बांधवाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे संचालनं दिव्यांग कल्याणकारी संघटना चे सदस्य प्रविण शहारे मोरगाव/अर्जुनी, कार्यक्रमाची प्रस्तावना दिव्यांग कल्याणकारी संघटना तालुका अध्यक्ष अशोक रामटेके यांनी मांडली. आभार नं. पं. दिव्यांग अध्यक्ष अमित देवानी यांनी केले, कार्यक्रमाच विशेष नियोजन अशोक रामटेके, अमित देवानी, तालुका सचिव मुरलीधर पालीवाल आणि इंदिरा भंडारी,जगदीश लोगडे,अशोक उरकुडे,रमेश शेंदरे,शैलेश साखरे,गोपीनाथ दरवडे, देवराम पुसाम, तिर्थराज काणेकर,गिताताई लंजे व सदस्यांनी परिश्रम घेतले.