हिंगणघाट एसटी आगारात चालक दिन साजरा

0
92

हिंगणघाट -_महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी च्या हिंगणघाट आगारांमध्ये दिनांक २४ जानेवारी रोजी *’चालक दिन’* साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्री शरद आवारे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्ष स्थानी गौतम शेंडे आगार व्यवस्थापक एस टी हिंगणघाट आगार हे होते.
या कार्यक्रमात डॉ. माधव कुसेकर साहेब (भा.प्र.से.) यांचे राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांना केले आवाहन पत्र वाटप करून त्याचे जयंत सडमाके सहायक वाहतूक अधीक्षक रा.प. हिंगणघाट आगार यांनी वाचन केले. शरद आवारे पोलीस उपनिरीक्षक, देवानंद पुन्नमवार पालक अधिकारी तथा विभागीय कर्मवर्ग अधिकारी रा.प. वर्धा, गौतम शेंडे आगार व्यवस्थापक रा.प. हिंगणघाट आगार यांच्या हस्ते सुरक्षित सेवा देणाऱ्या ८ चालक सर्वश्री अभय बहादुरे, अनिल करपते, बळीराम पुसनाके, गणेश पवार, प्रशांत भलमे, राहुल मून, गुलाब कळसकर, चिंधुजी राडे व डिझेल बचत करून उत्कृष्ट केपीटीएल आणलेल्या ५ चालक सर्वश्री विजय सोगे, शंकर गिरी, प्रवीण निकुरे, पुरुषोत्तम येरमे, प्रशांत वानखेडे, नितीन बेले, राजू कठाणे या चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित अन्य चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शरद आवारे , गौतम शेंडे, देवानंद पून्नमवार यांनी आपल्या भाषणातून सुरक्षित वाहतुकीसाठी, इंधन बचतीसाठी खर्च कमी करणे, उत्पन्न वाढविण्यासाठी उपस्थित चालक, वाहक आणि यांत्रिक यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर वाणे वाहतूक निरीक्षक रा.प. हिंगणघाट आगार यांनी, सूत्रसंचालन सय्यद आसिफ वाहतूक नियंत्रक, रा.प. हिंगणघाट आगार यांनी व आभार प्रदर्शन जयंत सडमाके सहायक वाहतूक अधीक्षक यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद डंभारे वरिष्ठ लिपिक, हितेंद्र हेमके सहायक कारागीर, बबन नटे वाहन परीक्षक, मयूर कोठारे वाहतूक लिपिक, उज्ज्वला बहादुरे सहायक, अनिकेत हजारे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.