जिल्हा नियोजन समितीची सभा आज,पालकमंत्री पाटील पहिल्यांदाच गोंदियात

0
419

गोंदिया, दि.24 : जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे सहकार मंत्री, तथा जिल्हयाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30  वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित केलेली आहे. पालकमंत्री पाटील हे २५ जानेवारीला नागपूर विमानतळावरुन मोटारीने गोंदियाला येत असून सकाळी ११ वाजता अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंजी.राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.तिथून ते गोंदियाला दुपारी १२ वाजता पोचणार आहेत.

         जिल्हा नियोजन समिती सभा 14 ऑगस्ट 2024 च्या इतिवृत्तास मंजुरी देणे व इतिवृत्तातील कार्यवाही मुद्यांच्या अनुपालन अहवालास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा माहे डिसेंबर 2024 अखेर पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेणे (सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना/ओटीएसपी योजना). जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्या पुनर्विनियोजनास मंजुरी देणे (सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना/ओटीएसपी योजना).. अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय. या सभेस सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी अद्ययावत माहितीसह नियोजित वेळेपूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.