मोहाडी ग्रांम पंचायतीच्या इतिहासात प्रथमताच जेष्ठ नागरिकांचे सत्कार •••••
गोरेगाव -२७ जानेवारी—तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व बेटी बचाव अभियान अंतर्गत मुलीच्या जन्मावर तिच्या आईला रोख ११००₹ व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व गावातील ७५ वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरिकाचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य तथा आजिवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळाचे प्रा रूपलाल कावडे होते तर ध्वजारोहण मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोहाडी ग्रांम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले,माजी सरपंच मदनलाल बघेले,माजी सरपंच धुर्वराज पटले, तंन्टामुक्त गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, पोलिस पाटील राजेश येळे,जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य राजेंद्र रहमतकर, जिल्हा परिषद वरिष्ठ प्रथामिक शाळेचे मुख्याध्यापक सी के बिसेन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन, सेवानिवृत्त प्राचार्य डि आर चौरागडे, ग्रांम पंचायत चे सदस्य भिवराज शेंन्डे, योगराज भोयर, खेमराज वाकले, पुस्तकला पटले,चंन्द्रकांता पटले,पुजा डोहळे,नेहा उके,प्रभा पंधरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए के वंजारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन के बिसेन,प्रमानंद तिरेले, कमलेश पटले,माजी सैनिक कुवरलाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आहे एक तरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता समाजात रूजलेली होती मात्र या मानसिकतेत बदल करण्यासाठी मोहाडी ग्रांम पंचायत ने पुढाकार घेत गावात मुलीच्या जन्मावर तिच्या आईला रोख ११००₹ व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे त्याच प्रमाणे गावातील ७५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले जेष्ठ नागरिकाचे सत्कार हे मोहाडी ग्रांम पंचायत च्या इतिहासात प्रथमच होत आहे जेष्ठ नागरिकाना मान, सन्मान देऊन सत्कार करित आहे जेष्ठ नागरिक म्हणजे आज समाजात असलेले अनुभवाचे साधन व खजिना आहे आज समाजात जेष्ठ नागरिकाना समाजात विशेष मान सन्मान आहे अशा सर्व जेष्ठ नागरिकाचे अनुभावातुन आपल्या ग्रांम पंचायत ला विशेष फायदा च होणार आहे व सर्व जेष्ठ नागरिकाचा सर्वांनी सन्मान करावा व जेष्ठ नागरिकानी सुध्दा आपले मान सन्मान राखुन आपले सन्मान विशेषित ठेवावे ग्रांम पंचायत मोहाडी सर्व जेष्ठ नागरिक सोबत राहून आपण सुचवलेल्या सर्व विकासात्मक कामे पूर्ण करणार आपल्या मागणी पूर्णता सहकार्य करून ग्रांम पंचायत सुध्दा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे असे आपले सहकार्य लाभावे असे प्रतिपादन सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले यावेळी गावातील १०० च्या जवळपास जेष्ठ नागरिकाचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी गावातील नागरिक महिला पुरूष विध्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन डि पी डावखरे सर तर आभार प्रदर्शन उपसरपंच मोहनलाल पटले यांनी केले.