गोंदिया, दि.27 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके हे 27 जानेवारीला गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता यवतमाळ येथून मोटारीने देवळी-बुटीबोरी-तुमसर-तिरोडा मार्गे गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 1 ते 1.30 पर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे कचारगड यात्रेच्या नियोजनासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या विविध संस्था व मुलींचे वसतिगृहास भेटी. सायंकाळी 7 वाजता गोंदिया येथून नागपूरकडे प्रयाण करतील.