अर्जुनी मोर. —जिल्हा परिषद गोंदियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरीला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सोबत सौ.चंद्रकलाताई चौधरी सभापती पंचायत समिती गोरेगाव, रामेश्वर महारवाडे उपसभापती पंचायत समिती गोरेगाव परीसरातील सरपंच , उपसरपंच , पत्रकार व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
*सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया ,सौ चंद्रकलाताई चौधरी मॅडम सभापती पंचायत समिती गोरेगाव , रामेश्वर महारवाडे उपसभापती पंचायत समिती गोरेगाव यांचे शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी बालजिवणापासून ते आजपर्यंतच्या अनेक घडामोडींना उजाळा दिला व पदाधिकारी, गावकरी व शिक्षक यांच्या समन्वयातून शाळेला नावारुपास आणले त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरी येथील विठोबा रोकडे मुख्याध्यापक व लाखेश्वर लंजे सहाय्यक शिक्षक यांचे भरभरून कौतुक केले.सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी शालेय मनमोहक परिसर पाहून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाखेश्वर लंजे सर यांनी केले तर सर्व पाहुण्यांचे आभार विठोबा रोकडे मुख्याध्यापक यांनी मानले.कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत पदाधिकारी,पालक शिक्षक संघ,माता पालक संघ यांनी सहकार्य केले.