जि.प.उपाध्यक्ष हर्षेंचा जि.प.कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने केला सत्कार

0
302

गोंदिया,दि.२७ः– गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पतसंस्था व ग्राम पंचायत अधिकारी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.श्री हर्षे यांचे पुष्पगुच्छ संस्था कालदर्शिका व डायरी देऊन जिल्हा परिषद महासंघ, ग्राम पंचायत अधिकारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मार्फत संयुक्तरित्या कर्मचारी पदाधिकार्यांच्या मार्फत शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.उपाध्यक्ष हर्षे यांच्याशी ग्रामीण विकास साधणे संदर्भात विविध अडीअडचणी व उपाय योजनांवर ग्रामपंचायत अधिकारी संघटन जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.यावेळी शिष्टमंडळात महासंघ सरचिटणीस संतोष तोमर, ग्राम पंचायत अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष तथा पतसंस्था सचिव कमलेश बिसेन, महासंघ कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल, उपाध्यक्ष चित्रा ठेंगरी, सुभाष खत्री, संतोष तुरकर, अश्विनी चेटूले,भगीरथ नेवारे, नंदलाल कावळे, जैन इत्यादी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.