परभणी, दि. 27 : – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज पाथरी शहरात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शहरातील विविध लोकोपयोगी कामांचे उद्घाटन व भूमीपूजन पार पडले.
पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्ता कामाचे भूमीपूजन श्री. शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गौतमनगर येथील बुध्द विहार परिसरासह शहरातील विविध ठिकाणच्या एलईडी लाईटचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.