परिट धोबी सेवा मंडळ तालुका महिला कार्यकारिणी गठीत

0
218

अर्जुनी मोर.– प्रजासत्ताक दिनानिमित्त अर्जुनी मोरगाव तालुकास्तरीय परीट धोबी महिला भगिनींची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी रवी भाऊ मेश्राम विभागीय सचिव परीट धोबी सेवा मंडळ, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सनत वाढई कार्याध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश, सौ जयश्री वाढई, विनोद बारसागडे, रवींद्र कावळे, इत्यादी उपस्थित होते. यात महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ तालुका अर्जुनी मोरगाव महिला कार्यकारिणी तयार करण्यात आले.
अध्यक्षपदी सौ. रोशनी क्षीरसागर, उपाध्यक्ष सौ. संध्या आशिष वाढई, सचिव सौ. स्वाती मुकेश वाढई, कोषाध्यक्ष सौ. मेघा दीपक क्षीरसागर, कार्याध्यक्ष सौ मनीषा विनोद बारसागडे, संघटक सौ. जयश्री सनत वाढई, सल्लागार सौ. सविता अशोक भाग्यवंत, सदस्य सौ लक्ष्मी रवींद्र पिल्लेवान, सौ रंजना उमेश राजगडे यांची एक मताने निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा महिला बचत गटाची निर्मिती करण्यात आली. अध्यक्षपदी सौ रोशनी क्षीरसागर, सचिव सौ स्वाती मुकेश वाढई, कोषाध्यक्षपदी सौ मेघा दीपक क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. 33 महिलांनी बचत गटाचे सदस्य स्वीकारले, उर्वरित महिलांना विनंती केल्यास लवकरच सभासदत्व दिले जाईल,
आगामी 23 फेब्रुवारीला संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे तसेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. शिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात जास्तीत जास्त महिला व पुरुष मंडळींनी सहभागी होण्याचा आवाहन करण्यात आले.
प्रास्ताविक व आभार सौ. मनीषा बारसागडे तर संचालन सौ रोशनी क्षीरसागर यांनी केले