अर्जुनी मोरगांव :* तालुक्याच्या बाराभाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दि.२७ जानेवारी २०२५ रोजी एक दिवसीय स्नेह सम्मेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटक सादरीकरण करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक कविता कापगते हे होते व शालिनी डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अतिथी विनोद चव्हाण मुख्याध्यापक पंचशील विद्यालय बाराभाटी, पदमाकर रंगारी अध्यक्ष जि.प.शाळा व्यवस्थापन समिती, सरस्वता चाकाटे सरपंच, किशोर बेलखोडे, राकेश पहीरे, शिशुपाल बेलखोडे, संजय चव्हारे, तुलाराम मारगाये,दिपा घरतकर, कविता येरणे व अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किशोर येरणे, भोजराज बेलखोडे, लालचंद्र मारगाये, कमलेश आन्दे,भगवान नंदेश्वर राजेश चुलपार सचिव आ.सो.बाराभाटी आदी ग्रामवासी उपस्थित होते.
स्नेहसम्मेलन कार्यक्रम होवु घातलेले अनेक नृत्य, एक अंकी नाटक सादर झाली असता समस्त ग्रामवासी यांच्या कडून चिमुकल्या मुला मुलीचे कौतुक करण्यात आले.