बुलढाणा,दि.28 : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून संपादित केलेल्या मातृतीर्थ बुलढाणा या कॅाफी टेबल बुक निर्मितीमधील योगदानासाठी बुलढाण्यातील प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे व पुरातनवास्तु, हेमाडपंथी मंदिरे तसेच पुरातन इतिहास जतन व संवर्धन करीत असलेल्या व इतर स्थळांची माहिती राज्यातील तसेच देशातील नागरिकांना व्हावी व पर्यटनाच्या संखेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा या कॉफी टेबल बुक मध्ये बुलढाण्यातील प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. गजेंद्र निकम, कीटक अभ्यासक फोटोग्राफर प्रा.आलोक शेवडे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. या छायाचित्रांच्या समावेशामुळे हे कॉफी टेबल बुक सुंदर व आकर्षक बनले असून या योगदानासाठी जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी या छायाचित्रकारांना प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपत्र देऊन प्रजासत्ताक दिनी सन्मानित केले. या कॅाफीटेबल बुकमध्ये मनिष झिमटे, सागर राणे, रोहित शर्मा, सुनील वाकोडे, चेतन राठोड, विजय पाटील, ऋषिकेश कुळकर्णी यांनी टिपलेल्या छायाचित्रांचाही समावेश आहे. या सर्व छायाचित्रकार बांधवांचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.